Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा आलेख पुन्हा एकदा घटला आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 957 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, दरम्यान नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत दोन हजारहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे पुन्हा एकदा दोन हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात काल 2 हजार 424 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 15 रुग्णांचा मृत्यू झाला होता. म्हणजे आज तुलनेनं 467 कोरोना रुग्ण कमी झाले आहेत.
देशात आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील कोरोनाबळींच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. कोरोना महामारी सुरु झाल्या आतापर्यंत देशात 5 लाख 28 हजार 822 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यामधील अधिक रुग्णांना मधुमेह, रक्तदाब या संदर्भातील आजार होते. दरम्यान, देशव्यापी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु असल्यामुळे कोरोनाचा वेग मंदावला आहे. देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात 219 कोटीहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने लसीकरणावर अधिक भर दिला आहे.
महाराष्ट्रात 231 नवे कोरोना रुग्ण
सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.14 टक्के एवढे झाले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत महाराष्ट्रात 231 नवीन रुग्ण आढळले असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. तर 164 जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. सर्वाधिक 111 रुग्ण मुंबईत आढळले असून याशिवाय 164 जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. 164 कोरोनामुक्त झाल्यानंतर आजवर एकूण 79 लाख 72 हजार 168 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.
सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 28 हजारांवरून 27 हजारांवर
देशातील कोरोना उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या देखील घटली आहे. सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 28 हजारांवरून 27 हजारांवर पोहोचली आहे. सध्या देशात 27 हजार 374 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. काल सक्रिय रुग्णांची संख्या 28,079 इतकी होती.