Coronavirus Cases in India: कोरोनानं (Covid-19) पुन्हा डोकं वर काढल्यामुळे धाकधूक वाढली आहे. अशातच देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या (Corona Updates) 9,355 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 5,31,424 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


बुधवारी (26 एप्रिल) देशात कोरोनाचे 9,629 रुग्ण आढळले होते. तसेच, 29 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, ज्यामध्ये एकट्या केरळमधील 10 रुग्णांचा समावेश होता. आज जाहीर झालेल्या आकडेवारीनंतर भारतातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 57,410 वर पोहोचली आहे. तर देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 4.08 टक्के आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 5.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. 


कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांबद्दल बोलायचं तर देशात आतापर्यंत चार कोटींहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर हा आकडा 4,43,35,977 वर पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 220,66,54,444 डोस देण्यात आले आहेत. यामध्ये गेल्या 24 तासांत 4 हजार 257 लोकांना लसीकरण करण्यात आलं आहे. तसेच, कोविड रुग्णांची एकूण संख्या 4.49 कोटींवर पोहोचली आहे. 


गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला होता पण, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने वेग पकडला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच आठवड्यात देशातील कोरोना संसर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंत्रालयाने राज्यांना कोविडचा सामना करण्यासाठी चार T म्हणजेच टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-टीकाकरण (लसीकरण) करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत.


घाबरू नका, खबरदारी बाळगा


कोरोनाता वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगानं केलं आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर खबरदारी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागानं दिला आहे.