Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाचा कहर वाढत असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासात प्राणघातक कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, ओमायक्रॉन व्हेरियंटचे संक्रमण भारतात वेगाने पसरत आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे तीन लाख 37 हजार 704 नवीन रुग्ण आढळले असून 488 जणांचा मृत्यू झाला आहे. काल ही दैनंदिन रुग्णवाढ तीन लाख 47 हजार 254 इतकी होती. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारांच्या 10 हजार 50 रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील दैनिक सकारात्मकता दर आता 17.22 टक्के इतका आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.


सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 21 लाख 13 हजार 365


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या 21 लाख 13 हजार 365 झाली आहे. त्याचबरोबर या कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या चार लाख 88 हजार 884 झाली आहे. आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात दोन लाख 42 हजार 676 लोक बरे झाले. तसेच आतापर्यंत तीन कोटी 63 लाख 1 हजार 482 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.







 


आतापर्यंत 161 कोटींहून अधिक डोस देण्यात आले


देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 161 कोटींहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 67 लाख 49 हजार 746 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 161 कोटी 16 लाख 60 हजार 78 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.


देशातील ओमायक्रॉनबाधितांची 10 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद


देशात आतापर्यंत 10 हजार 50 जणांना ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाली आहे. या पैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आढळले आहेत. आदल्या दिवसाच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या प्रकरणांमध्ये 3.69 टक्के वाढ झाली आहे.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha