मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 394 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6817 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 11 जण मुंबईचे तर पुण्यातील पाच आणि मालेगाव येथील दोन रुग्णांचा मृत्यू आहे. राज्यात आतापर्यंत 301 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 117 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 2 हजार 189 नमुन्यांपैकी 94 हजार 485 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 6817 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 19 हजार 161 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 8814 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 957 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 12 पुरूष तर 6 महिला आहेत. त्यातील नऊ जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 6 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर तीन रुग्ण 40 वर्षांखालील आहे.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 6817

मृत्यू - 301

मुंबई महानगरपालिका- 4447 (मृत्यू 178)

ठाणे- 35(मृत्यू 2 )

ठाणे महानगरपालिका- 220 (मृत्यू 4)

नवी मुंबई मनपा- 125(मृत्यू 4)

कल्याण डोंबिवली- 131 (मृत्यू 3)

उल्हासनगर मनपा - 2

भिवंडी, निजामपूर - 12

मिरा-भाईंदर- 118 (मृत्यू 2)

पालघर- 21 (मृत्यू 1 )

वसई- विरार- 114 (मृत्यू 3)

रायगड- 14

पनवेल- 40 (मृत्यू 1)

नाशिक - 4

नाशिक मनपा- 7

मालेगाव मनपा - 116 (मृत्यू 11)

अहमदनगर- 25 (मृत्यू 2)

अहमदनगर मनपा - 8

धुळे -6 (मृत्यू 1)

धुळे मनपा - 16 (मृत्यू 1)

जळगाव- 6 (मृत्यू 1)

जळगाव मनपा- 2 (मृत्यू 1)

नंदुरबार - 7 (मृत्यू 1)

पुणे- 43 (मृत्यू 2)

पुणे मनपा- 848 (मृत्यू 63)

पिंपरी-चिंचवड मनपा- 70 (मृत्यू 2)

सातारा- 20 (मृत्यू 2)

सोलापूर- 1

सोलापूर मनपा- 38 (मृत्यू 3)

कोल्हापूर- 7

कोल्हापूर मनपा- 3

सांगली- 25

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 1

रत्नागिरी- 8 (मृत्यू 1)

औरंगाबाद मनपा- 42 (मृत्यू 5)

जालना- 2

हिंगोली- 7

परभणी मनपा- 1

लातूर -9

उस्मानाबाद-3

बीड - 1

नांदेड मनपा - 1

अकोला - 11 (मृत्यू 1)

अकोला मनपा- 12

अमरावती मनपा- 13 (मृत्यू 1)

यवतमाळ- 23

बुलढाणा - 21 (मृत्यू 1)

वाशिम - 1

नागपूर- 2

नागपूर मनपा - 99 (मृत्यू 1)

चंद्रपूर मनपा - 2

गोंदिया - 1

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 512 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 7702 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 28.88 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

Dr Shekhar Mande | कोरोना व्हायरसविरोधात कशा प्रकारे संशोधन सुरू आहे? डॉ. शेखर मांडेंशी संवाद