नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून काल एकाच दिवसात देशात तीन लाख 46 हजार 786 रुग्णांची भर पडली आहे. देशातील वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. गेल्या 24 तासात 2624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत वाढ झाली असून ती आता 25 लाख 52 हजार 940 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात दोन लाख 19 हजार 838 रुग्ण बरे झाले आहेत. 


देशातील आजची कोरोना स्थिती : 



  • एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 66 लाख 10 हजार 451

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 38 लाख 67 हजार 997

  • एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 25 लाख 52 हजार 6940

  • कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 89 हजार 544

  • देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 13 कोटी 83 लाख 79 हजार 832 डोस 



शुक्रवारी एकाच दिवशी देशभरात कोरोनाच्या 17 लाख 53 हजार 569 चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात एकूण 27 कोटी 61 लाख 99 हजार 222 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच लसीकरणाच्या कार्यक्रमानेही वेग घेतला आहे. 


भारतात कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 83.92 इतका आहे तर मृत्यू दर हा 1.15 टक्के इतका आहे. भारतातील 59 टक्के अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यात आढळते. 


महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
महाराष्ट्रात शुक्रवारी 66 हजार 836 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर 74 हजार 045 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 34 लाख 04 हजार 792 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.81 टक्के झाले आहे. राज्यात शुक्रवारी 773 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे.



महत्वाच्या बातम्या :