Corona Update Today : देशात सलग चौथ्या दिवशी 50 हजारांहून कमी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भावात जरी घट दिसत असली तरी अद्याप संकट पूर्णपणे टळलेलं नाही. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 48,786 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 1005 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यापूर्वी सोमवारी 46148, मंगळवारी 37566 आणि बुधवारी 45951 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 61,588 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


देशातील आजची कोरोना स्थिती :


एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 4 लाख 11 हजार 634
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 94 लाख 88 हजार 918
एकूण सक्रिय रुग्ण : 5 लाख 23 हजार 257
एकूण मृत्यू : 3 लाख 99 हजार 459


देशात सलग 49व्या दिवशी कोरोनाबाधितांहून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक आहे. 30 जूनपर्यंत देशात 33  कोटी 57 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर बुधवारी 27.60 लाख लसीचे डोसही देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 41 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 19 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे. 



राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, सध्या 1 लाख 16 हजार 364 अॅक्टिव्ह रुग्ण


राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. कालच्या तुलनेत काल (बुधवारी) रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात काल 9,771 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10, 353 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 58,19,901 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.02% टक्क्यावर गेला आहे.


तर राज्यात काल 141 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 364 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे, कोल्हापुरात 1400 रुग्ण तर नंदूरबारात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली नाही. 


आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 16 लाख  37 हजार 950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 61 हजार 404 (14.56 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 17 हजार 926 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 173 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांपैकी यवतमाळमध्ये सर्वात कमी 62 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 17 हजार 407 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


मुंबईत आज 692 रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 692 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 96 हजार 105 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8351 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 716 दिवसांवर गेला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :