नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसच्या 4213 च्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 1559 कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 20917 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील रिकव्हरी रेट 31.15 टक्के आहे. देशातील कोरोनाबाधीतांची संख्या आता 67 हजार 152 वर पोहोचली आहे.


ज्यांना लक्षणं आहेत त्यांनी पुढे येऊन सांगा- लव अग्रवाल


कोरोना व्हायरसविरुद्धच्या या लढाईत लोकांचं सहकार्य महत्वाचं आहे. ज्यांना लक्षणे दिसत आहेत, त्यांनी पुढे येऊन त्याबद्दल डॉक्टरांना सांगावं. तसेत कोरोनाची धर्माच्या आधारावर मॅपिंग संबंधित सर्व बातम्या चुकीचे, निराधार आणि बेजबाबदार आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा वंश, धर्म आणि कोणत्याही ठिकाणाशी काहीही संबंध नाही. खबरदारी न घेतल्यामुळे कोरोना व्हायरस परसतो, असं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं.


पुढील काही आठवड्यांसाठी कामगारांसाठी रोज 100 ट्रेन धावतील - गृह मंत्रालय


लॉकडाऊनमध्ये अडकलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्या घरी पोहचावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. 10 मे पर्यंत वंदे भारत मिशन अंतर्गत 4000 हून अधिक लोकांना परदेशातून भारतात आणण्यात आलं आहे, असं गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितलं. आज सकाळी गृह मंत्रालयाने रेल्वे आणि राज्य सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पुढील काही आठवड्यांकरिता दररोज 100 विशेष ट्रेन धावणार आहेत. ज्यांच्याकडे ट्रेनचे तिकीट असेल त्यांना वेगळा पास घ्यावा लागणार नाही. जे लोक विशेष गाड्यांद्वारे त्यांच्या घरी पोहोचत आहेत, त्यांना राज्य सरकारांच्या कोरोना संबंधीच्या अटींचं पालन करावं लागणा आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.


संबंधित बातम्या