Corona Cases Update Today : भारतात कोरोना  (Corona Update) प्रादुर्भावात गेल्या काही दिवसांपासून घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2,451 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत लागण झालेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,30,52,425 वर पोहोचली आहे. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 14,421 वर पोहोचली आहे. 


अहवालानुसार, गेल्या 24 तासांत भारतात 54 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 5,22,116 झाली आहे. मंत्रालयानं म्हटलं आहे की, एकूण बाधितांपैकी 0.03 टक्के सक्रिय प्रकरणं आहेत, तर बरं होण्याचं प्रमाण 98.76 टक्के आहे. त्याच वेळी, 24 तासांत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 808 प्रकरणांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दिवसाचा पॉझिटिव्हीटी दर 0.53 टक्के आणि आठवड्याचा पॉझिटिव्हीटी दर 0.43 टक्के नोंदविला गेला आहे. 







राजधानीतील प्रादुर्भाव वाढताच 


देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचे नवे रुग्ण झपाट्यानं आढळून येत असून यामुळे पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढली आहे. दिल्लीत कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजारांच्या पुढे गेली आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.


राज्यात गुरूवारी 179 कोरोना रुग्णांची नोंद तर 106 कोरोनामुक्त 


राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार  होताना  दिसत आहे.  गुरूवारी राज्यात  179  रुग्णांचे निदान झालं आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 762 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. राज्यात गेल्या 24 तासात  106  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,27, 789  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


दरम्यान, राज्यात सध्या 762 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 450 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 57 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.