Goa Cm Pramod Sawant :  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील हिंदूंचे धर्मांतर (Religious conversions) पूर्णपणे थांबवल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकारने 100 दिवसांच्या आत धर्मांतरावर बंदी घातली आहे. बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान सीएम सावंत यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या 'डबल इंजिन की सरकार'च्या कामाचा आढावा घेण्यात आला आहे. 


कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, आमच्या सरकारने धर्मांतरावर कठोर भूमिका घेतली आहे. आम्ही हिंदूंचे धर्मांतर थांबवले जे पूर्वी होत होते.' विशेष म्हणजे याआधीही त्यांनी राज्यातील जनतेला धर्मांतराबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. ते पुढे म्हणाले, अनेक वर्षांपासून सुरू असलेले धर्मांतर थांबले आहे. बेकायदेशीर भूसंपादन प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही एसआयटी स्थापन केली आहे.


मार्चमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 20 जागा जिंकत गोव्यातील सत्ता राखली आहे. याशिवाय काही अपक्षांनीही भाजपला साथ दिली. त्याचवेळी 12 जागा जिंकून काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे.


चुकूनही धर्मांतर होता कामा नये (Religious conversions)


एप्रिलमध्ये एका मंदिराच्या कार्यक्रमात आलेले सावंत म्हणाले होते की, पुन्हा एकदा धर्मावर हल्ला होत आहे. मी खोटं बोलत नाही. गोव्यातील अनेक भागात लोक धर्मांतराकडे जात असल्याचे आपण पाहिले आहे. काही गरीब आहेत, काही संख्येने कमी आहेत, काही मागासलेले आहेत, काहींना अन्न किंवा नोकरी नाही अशा विविध गोष्टींचा फायदा घेत आहेत. अशा परिस्थितीत चुकूनही धर्मांतर होता कामा नये, असे आमचे म्हणणे आहे.


तर आपला देश सुरक्षित असेल


ते म्हणाले की, 'सरकार कधीही धर्मांतराला परवानगी देत ​​नाही, पण तरीही मला वाटते की लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. गावातील मंदिर ट्रस्टने सतर्क राहण्याची गरज आहे, कुटुंबांनी सतर्क राहण्याची गरज आहे'. ते पुढे म्हणाले की, 60 वर्षांपूर्वी (गोव्यातील पोर्तुगाल राजवट) आम्ही 'देव, धर्म आणि देश' म्हटले होते आणि याच भावनेने पुढे गेलो होतो. जर आपला देव सुरक्षित असेल तर आपला धर्म सुरक्षित असेल आणि आपला धर्म सुरक्षित असेल तर आपला देश सुरक्षित असेल.


इतर महत्त्वाच्या बातम्या