Congress Agitation live Update : राहुल गांधींची ईडीकडून पहिल्या टप्प्यातील चौकशी पूर्ण
Congress Agitation live Update : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राहुल गांधी यांची ईडीकडून पहिल्या टप्प्यातील चौकशी पूर्ण झाली आहे.
Congress Agitation: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या निषेधार्थ आज औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या समर्थनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आलं. शहरातील क्रांतीचौकात हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. केंद्र सरकार तपास संस्थांचा गैरवापर करत असल्याचं सांगत काँग्रेस विरोधात मुद्दामहून ईडीचा वापर केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यापुढे ईडीचा असाच वापर सुरू राहील्यास रस्त्यावर उतरू असा ईशाराही आंदोलकांनी दिलाय.
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची ईडीकडून पहिल्या टप्प्यातील चौकशी पूर्ण झाली आहे, सुत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात राहुल गांधी यांना वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आलं. चौकशीचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे.
Mumbai Congress : राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात ईडीनं सुरु केलेल्या कारवाईचं मुंबईत तीव्र पडसाद पाहायला मिळाले. सीएसएमटी स्थानकाजवळील जीपीओ येथून निघालेला काँग्रेसचा निषेध मोर्चा बलार्ड पिअरपर्यंत पोहोचला आहे. ईडी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा मोर्चा अडवण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. या मोर्चात काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मंत्री सहभागी झाले आहेत. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, नसीम खान, भाई जगताप, चरणसिंह सप्रा हे नेते यात आघाडीवर होते. तेसच काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
मुंबईत काँग्रेसनं काढलेला मोर्चा बॅलार्ड पिअर इथं अडवला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप यांना ताब्यात घेतलं
Vasant Purke : 2014 मध्ये चमत्कार झाला आणि एक फेकू नेतृत्व समोर आलं. काँग्रेस इंग्रजांना घाबरले नाही, तर यांना काय घाबरणार असे म्हणत काँग्रेसचे नेते वसंत पुरके (Vasant Purke) यांनी भाजप सराकरवर निशाणा साधला. पिसाळलेल्या कुत्र्यासारखं काँग्रेसला वागता येत नाही. मात्र, हे पिसाळलेल्या कुत्र्यासारखं अंगावर येत असल्याचे पुरके म्हणाले.
नागपुरातील सेमिनरी हिल्स परिसरात ईडी कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन सुरु झाले आहे. राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर हे आंदोलन केले जात आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. काँग्रेसचे इतर नेते दाखल झाले आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुनील देशमुख, माजी आमदार वसंत पुरके आंदोलनस्थळी पोहोचले आहेत.
Priyanka Gandhi : प्रियंका गांधी या देखील ईडीच्या कार्यलयावर काढलेल्या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. ईडीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. राहुल गांधी ईडीच्या कार्यलयात दाखल झाले आहे. ईडीकडून राहुल गांधी यांची चौकशी सुरु झाली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहे. त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
पार्श्वभूमी
Congress Agitation : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. त्यानंतर राहुल गांधी आज ईडीपुढं जबाब नोंदवणार आहेत. याविरोधात काँग्रस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. देशभरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरातही काँग्रेसने जोरदार आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, दिल्लीतही काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसचे बडे नेते यामध्ये सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसनेही याविरोधात जोरदार आंदोलन केलं आहे. सुनो तानाशाहा, तोतों से डरा न पाओगे तुम हाथकंडों से हमें झुका ना पाओगे असे म्हणत भाजपविरोधी घोषणाबाजी केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज ईडीसमोर (ED) आपला जबाब नोंदवणार आहेत. राहुल गांधी ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर एक पोस्टर लावले आहे. हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर 'सत्य झुकेगा नही'! असं लिहलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना यापूर्वी दोन जून रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. पण ते विदेश दौऱ्यावर असल्यामुळं त्यांनी ईडीकडं वेळ वाढवून मागितली होती. त्यानंतर ईडीनं त्यांना 13 जूनला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. दुसरीकडे, सोनिया गांधी यांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. कारण त्यांना कोरोनाची लागण झाली असून अद्याप त्या कोरोनामुक्त झाल्या नाहीत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मनी लाँड्रिंग प्रकरणी राहुल गांधींना ईडीने पाठवलेले समन्स 'निराधार' आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते केले जातील, असे चिदंबरम म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -