मुंबई : गुजरात आणि इशान्येकडील राज्य काबीज केल्यानंतर आता भाजपसाठी लक्ष्य असणारी कर्नाटक विधानसभेची निवडणूक महिन्यावर येऊन ठेपली आहे. मात्र ‘इंडिया टुडे’नं केलेल्या सर्व्हेनुसार कर्नाटकमध्ये भाजपपेक्षा काँग्रेसचंच पारडं जड असल्याचं समोर आलं आहे.


भाजपच्या खात्यात फक्त ७८ ते ८६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला ९० ते १०१ चा पल्ला गाठता येईल. असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.

याशिवाय जनता दल सेक्युलरला ३४ ते ४३ जागा मिळण्याची शक्यता आहे. २२४ जागा असणाऱ्या कर्नाटक विधानसभेचा बहुमताचा आकडा ११३ असल्यानं काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्तेसाठी चांगलीच चढाओढ असेल. मात्र मणिपूर गोव्यात काँग्रेसला बहुमत असूनही भाजपनं काँग्रेसच्या तोंडचा घास हिरावून घेतला होता. त्यामुळे या कर्नाटकचा गड कोण काबिज करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.