नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून काँग्रेसने उर्वरित अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत बहिष्कार कायम राहिल, असा पवित्रा काँग्रेस खासदारांनी घेतला आहे.


https://twitter.com/ANI_news/status/829341167791677440

पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात जवळपास 35 वर्षे देशाची अर्थव्यवस्था माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडे होती. मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. त्यामुळे बाथरुममध्ये रेनकोट घालून अंघोळ कशी करावी, ते मनमोहन सिंहांकडून शिकावं, असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं होतं.

दरम्यान या वक्तव्यावर आपण काहीही बोलणार नाही, असं मनमोहन सिंह यांनी स्पष्ट केलं. मात्र काँग्रेसने अर्थसंकल्पीय अधिवशेनाच्या उर्वरित सत्रांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदारांनी गदारोळ करत सभागृह सोडलं. त्यामुळे काही काळासाठी मोदींना भाषण थांबवावं लागलं. त्यांनी नोटाबंदीवरही भाष्य केलं.

इंदिरा गांधींवर टीका

बसू यांनी सांगितलं होतं की, इंदिरा गांधी यांचं सरकार काळ्या पैशावरच टिकून आहे. त्यांचं राजकारण काळ्या पैशावर टिकून आहे. त्यामुळे नोटाबंदीची गरज असल्याचा रिपोर्ट लागू करण्यात आला नाही आणि दाबून ठेवण्यात आला, असा घणाघातही मोदींनी केला.

”नोटाबंदी ही जगभरातील अर्थतज्ञांसाठी केस स्टडी”

नोटाबंदीच्या निर्णयाला देशातील जनतेने पाठिंबा दिला. देशातील जनता अडचणींशी लढण्यासाठी त्रास सहन करायलाही तयार आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं मोदी म्हणाले. तसंच भारतातील नोटाबंदी ही जगभरातील अर्थतज्ज्ञांसाठी एक केस स्टडी आहे, कारण एवढा मोठा निर्णय जगभरात कुठेच झाला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातमी : बाथरुममध्ये रेनकोट घालणं मनमोहन सिंहांकडून शिका : मोदी