मुंबई : भारतीय नौदलाचा युद्धाचा सराव अरबी समुद्रात सुरु आहे. यात जवळपास 40 हजार नौदलाचे जवान सहभागी झाले आहेत. ट्रोपेक्स 2017 या थिएटर पातळीचा सराव आहे, ज्यात नौदलासोबतच हवाईदल, आर्मी आणि तटरक्षक दलही सहभागी झालं आहे.


एक महिना सुरु असणाऱ्या या सरावादरम्यान युद्धजन्य परिस्थीती बनवण्यात आली आहे. जर भविष्यात कधी युद्धजन्य परिस्थीती उद्भवली तर तीनही सैन्यदलं एकत्र कसा लढा देऊ शकतील, याचं प्रशिक्षण सध्या देण्यात येत आहे.

https://twitter.com/indiannavy/status/829277233260986371

24 जानेवारीपासून मुंबई आणि गोव्याच्या पश्चिम किनाऱ्यावर सुरु झालेला हा सराव आता अरबी समुद्रात ठिकठिकाणी सुरु करण्यात आला आहे. या सरावात नौदलाच्या 60 युद्धनौका, पाच पाणबुड्या आणि जवळपास 70 लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्सही सहभागी करुन घेण्यात आली आहेत. एयरक्राफ्ट कॅरियरसोबत आयएनएस विक्रमादित्य, जलाश्व, शिवालिक क्लास शिप, तलवार क्लास, आयएनएस चक्र यांचाही समावेश करण्यात आला आहे.

https://twitter.com/indiannavy/status/828558955022528518

दर वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान नौदलाकडून युद्धाचा सराव केला जातो. मात्र पंतप्रधान मोदींनी तीनही सैन्यदलांना या युद्धसरावात सामील करुन घेण्याबद्दल सुचना केल्या होत्या.