नवी दिल्ली: आसाम आणि केरळच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाला मोठ्या सर्जरीची गरज आहे, असं मत काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केलं. त्यांनी केलेल्या या ट्विटची जोरदार चर्चाही होत आहे. त्यांच्या रोख नेमका कुणाकडे, हे स्पष्ट नसलं तरी त्यांच्या ट्विटवरुन तर्क-वितर्क लढवले जात आहेत.


 

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभेचे निकाल जाहीर झाले. त्यात आसाम आणि केरळ या दोन राज्यात काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली.

 

त्यामुळे देशात आता केवळ ६ राज्यात काँग्रेसची सत्ता शाबूत आहे. त्यापैकी कर्नाटक वगळता एकही मोठं राज्य काँग्रेसकडे नाही.