अहमदाबाद : काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदावारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 77 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने दोन याद्या जाहीर केल्यानंतर काँग्रेसने उमेदावारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे.
हार्दिक पटेल काँग्रेसला पाठिंबा देण्याची औपचारिक घोषणा करणार आहे. त्यामुळे काँग्रेसने पाटीदार समाजाच्या नेत्यांनाही तिकिट दिलं आहे. पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचे संयोजक ललित वसोया यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आरक्षणासहित इतर मुद्द्यांच्या अटीवर पाटीदार आरक्षण आंदोलन समिती अर्थात PAAS ने काँग्रेसने पाठिंबा देण्याचं मान्य केलं आहे. याची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.
https://twitter.com/Madrassan/status/932292963991937025
भाजपने गुजरातमध्ये आतापर्यंत 182 पैकी 106 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. म्हणजे अजून 76 उमेदावारांची यादी जाहीर करणं बाकी आहे. कोणत्याही क्षणी ही यादी जाहीर केली जाऊ शकते.
आतापर्यंत सात विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं नाही. तर पाटीदार समाजाच्या नेत्यांना जास्त प्रमाणात तिकिटं देण्यात आली आहेत. काँग्रेसमधून भाजपात आलेल्यांनाही तिकिटं दिली आहेत.