नवी दिल्ली : देशातील कोरोनाची परिस्थिती केंद्र सरकारने ज्या पद्धतीने हाताळली आहे त्यावरुन काँग्रेसने सातत्याने टीका केली आहे. आताही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना देशात केवळ खोटं पसरवणं आणि फुकाच्या घोषणा देण्याचं काम सुरु असून तेच गुप्त मंत्रालय सर्वात सक्रिय मंत्रालय असल्याचं सांगितलं.


राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. आज त्यांनी आपल्या एका ट्वीटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली असून त्यात म्हटलं आहे की, "देशातील सर्वात सक्रिय मंत्रालय कोणतं आहे? खोटं पसरवणारं आणि फुकाच्या घोषणा देणारं गुप्त मंत्रालय हेच सर्वात सक्रिय मंत्रालय आहे."


 






शनिवारी राहुल गांधी यांनी देशातील वाढती महागाई आणि इतर प्रश्नावरुन केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं. ते म्हणाले की, देशातील महागाई, महामारी आणि बेरोजगारीची समस्या समोर असतानाही कोण यावर मौन पत्करलं आहे हे देशातील प्रत्येकजण जाणतो. 


 






काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर अनेकदा टीका केली आहे. देशातल्या अनेक नागरिकांकडे इंटरनेट नाही, त्यांना लसीकरणाचा अधिकार नाही का असा सवाल करत त्यांनी लसीकरण केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाचं लसीकरण होण आवश्यक आहे अशी मागणी केली होती. 


महत्वाच्या बातम्या :