नवी दिल्ली: मणिपूरचा हिंसाचार (Manipur Violence) हा केंद्र सरकार थांबवू शकत होतं, पण सरकारने तसं केलं नाही, हा हिंसाचार सुरूच रहावा अशीच सरकारची इच्छा असल्याचं दिसतंय अशी टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली. मणिपूर लष्कराच्या हाती द्या, दोन दिवसात हिंसाचार थांबेल असंही ते म्हणाले. 


काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की काल पंतप्रधान मोदींनी संसदेत 2 तास 13 मिनिटे भाषण केले, ज्याच्या शेवटी ते मणिपूरबद्दल दोन मिनिटे बोलले. पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, मणिपूरमध्ये अनेक महिन्यांपासून मणिपूर जळत आहे, खून, बलात्काराच्या घटना घडत आहेत. पंतप्रधान काल सभागृहात विनोद सांगत हसत होते. ते त्यांना शोभत नाही. विषय काँग्रेस किंवा माझा नव्हता, तो मणिपूर होता.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतमातेची हत्या केल्याचा आरोप मी सभागृहात केला. मणिपूरमध्ये मैतेई परिसरात आम्हाला सांगण्यात आले की, तुमच्या सुरक्षा दलात कोणीही कुकी आला तर आम्ही त्याला ठार मारू. कुकी परिसरात मैतेईंसाठीही असेच बोलले जात होते. राज्याची हत्या करून फाळणी झाली आहे. म्हणूनच मी म्हणालो की भाजपने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली.


लष्कर दोन दिवसात सर्व काही थांबवू शकते


पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये जाऊ शकत नाहीत तर त्यांनी लष्कराला पाठवावं. भारतीय लष्कर दोन दिवसात मणिपूरमधील हिंसाचार थांबवू शकते. पण मोदींनी हे करायचं नाही, त्यांना मणिपूर जाळायचं आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये मणिपूरमध्ये असं कधीही घडलं नव्हतं. मी संसदेत जे काही बोललो ते चुकीचं नाही. भारतमाता हा शब्द रेकॉर्डवरून काढण्यात आला. 


राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा


राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान किमान मणिपूरला जाऊ शकले असते, समुदायांशी बोलले असते. 2024 मध्ये पीएम मोदी पंतप्रधान होतील की नाही हा प्रश्न नाही, प्रश्न मणिपूरचा आहे जिथे मुले आणि लोक मारले जात आहेत.


पंतप्रधानांचे भाषण स्वतःबद्दल होते


राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या राजकारणामुळे राज्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळेच मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली आहे, असे मी म्हणालो. पंतप्रधानांनी मणिपूरच्या महिलांची खिल्ली उडवली. पंतप्रधान आमचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी दोन तास काँग्रेसची खिल्ली उडवताना पाहणे योग्य नव्हते. मी वाजपेयी, देवेगौडा यांना पाहिले आहे, त्यांनी हे केले नाही. पंतप्रधानांचे भाषण भारताबद्दल नव्हते तर ते स्वतःबद्दल होते.


आमचे काम थांबणार नाही


राहुल गांधी म्हणाले की, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली आणि पंतप्रधान त्यांच्या घोषणा देत आहेत. हजारो शस्त्रांची लूट मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली झाली, मग हे सर्व चालू राहावे असे गृहमंत्र्यांना वाटते का? त्यांनी आमच्या खासदारांना निलंबित केले तरी आमच्या कामात काही फरक पडणार नाही. मणिपूरमधील हिंसाचार थांबवणे हे आमचे काम आहे.


राहुल गांधी म्हणाले की, मला माहित आहे की मीडिया सरकारच्या नियंत्रणात आहे, राज्यसभा, लोकसभा टीव्ही नियंत्रणात आहेत, पण मी माझे काम करत आहे आणि करत राहीन. जिथे जिथे भारत मातेवर हल्ला होईल तिथे तुम्हाला मी भारतमातेचे रक्षण करताना दिसेल.


ही बातमी वाचा :