नवी दिल्ली : ''काँग्रेसचं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान होतं. काँग्रेसने देशाला अनेक महापुरूष दिले,'' असं वक्तव्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी केलं. दिल्लीत संघाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय अधिवेशनात ते बोलत होते.
‘भविष्य का भारत : RSS दृष्टिकोन’ नावाच्या कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्याबाबत उपस्थितांना विस्ताराने माहिती दिली. संघाचं कार्य अद्वितीय असल्याचं ते म्हणाले.
“लोक संघाला समजू शकत नाहीत”
''आपण तिरंग्याचा सन्मान करतो, देशासाठी जगलं पाहिजे. भारत हिंदू राष्ट्र होतं, आहे आणि राहिल. हिंदुत्व आपल्या समाजाला एकजूट ठेवतं. संघाला लोक समजू शकत नाहीत. कारण संघ अनोखा आहे. सत्तेत कोण आहे, याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. फक्त आम्ही कार्य पार पाडतो,'' असं मोहन भागवत म्हणाले.
“आमच्याशी सहमत होण्यासाठी कुणावर दबाव नाही”
''संघ सर्वात मोठी लोकशाही संघटना आहे, जिथे लोकशाहीचं पालन केलं जातं. संघाची कार्यपद्धती वेगळी आहे. आमच्याशी सहमत होण्यासाठी आम्ही कुणावर जबरदस्ती करत नाही. आम्ही योग्य असू तर लोक स्वत:हून सहमत होतील. विविधतेवरून भेदभाव केला जाऊ नये. विविधतेचा आनंद साजरा केला पाहिजे,'' असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.
या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये अभिनेत्री मनीषा कोईराला, अभिनेते रवी किशन, अन्नू कपूर यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश होता.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचं मोठं योगदान : मोहन भागवत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Sep 2018 09:38 PM (IST)
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्याबाबत उपस्थितांना विस्ताराने माहिती दिली. संघाचं कार्य अद्वितीय असल्याचं ते म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -