Cencus नवी दिल्ली : जनगणनेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या 40 प्रश्नांमध्ये जाती संदर्भातील प्रश्नाच्या तिथे एससी आणि एसटी प्रवर्गाचा उल्लेख आहे. मात्र, ओबीसी प्रवर्ग (OBC) असा स्वतंत्र कॉलम नसल्यानं ओबीसी संघटनांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता काँग्रेसनं याच मुद्यावर मोठं अभियान सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या ओबीसी विभागाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक 18 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे.  

Continues below advertisement

काँग्रेसकडून आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकीला ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जय हिंद यांच्यासह 7 राज्यामधील 300 जिल्ह्यांमधील ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सहभागी होतील. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली आणि राजस्थान या सारख्या निवडणूक असलेल्या राज्यांमधील ओबीसी पदाधिकारी बैठकीत सहभागी होतील. काँग्रेसच्या ओबीसी आघाडीतील महिला विंगच्या सर्व पदाधिकाऱ्यांना देखील बोलावण्यात आलं आहे. 

बैठकीत रणनीती ठरणार? 

काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीत जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्याव आगामी काळात निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये प्रामुख्यानं उचलण्याबाबत चर्चा होईल. पार्टी या मुद्याला मागासवर्गीय समाजाचा अधिकार, प्रतिनिधीत्व आणि सामाजिक न्याय या मुद्यांना जोडून जनतेत जाण्याची तयारी करत आहे. 

Continues below advertisement

काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जय हिंद यांनी एबीपी न्यूजसोबत बोलताना म्हटलं की जनगणना 2027 मध्ये ओबीसी कॉलम हटवणं दुर्भाग्यपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला ओबीसी म्हणतात. मात्र, ओबीसींचा सन्मान करत नाहीत. मागासवर्गाची लढाई राहुल गांधी आणि काँग्रेस लढत असल्याचं अनिल जयहिंद म्हणाले.  

अनिल जय हिंद म्हणाले की त्यांनी ही बैठक वंचितांना न्याय देण्यासाठी बोलावण्यात आली आहे. सर्व वर्गाला समान आणि त्यांचा अधिकार मिळावा, असं म्हटलंय.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये होणारी बैठक काँग्रेसच्या ओबीसी समुदायापर्यंत पोहोचण्यासंदर्भातील महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. काँग्रेस पार्टी हा मुद्दा संघटनेतील जिल्हा स्तरावर घेऊन जाण्यासंदर्भात तयारी करत आहे.