Bharat Jodo Yatra : येत्या सात सप्टेंबरपासून काँग्रेसची 'भारत जोडो'  (Bharat Jodo Yatra) ही पदयात्रा सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांची तयारी सुरु आहे. या यात्रेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या (29 ऑगस्ट) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) महासचिवांची  बैठक बोलवण्यात आली आहे. तसेच यावेळी भारत जोडी यात्रेच्या राज्य समन्वयकांना देखील बोलावण्यात आलं आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरूवात होणार आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये ही यात्रा संपणार आहे. तामिळनाडूमध्ये 7 ते 10 सप्टेंबर अशी चार दिवस ही यात्रा चालणार आहे.


ज्या राज्यांमधून ही भारत जोडो यात्रा जामार आहे, त्याबाबत काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी माहिती दिली. तसेच या यात्रेचा समन्वय साधणाऱ्यांची नावे देखील त्यांनी सांगितली आहे. यावेळी खेरा यांनी गुलाम नबी आझाद यांच्याबाबतही प्रतिक्रिया दिली.  आझाज असले काय आणि नसले काय, त्यांच्याशिवाय काँग्रेस पार्टीची पुढची वाटचाल सुरुच राहिल असेही खेरा म्हणाले.


आझाद किंवा आझाद यांच्याशिवाय पक्ष वाढतच जाणार आहे.


काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा म्हणाले की, ज्या राज्यांमधून ही "ऐतिहासिक" यात्रा पार पडेल, त्या राज्यांमधील 'भारत जोडो यात्रे'च्या माध्यम क्रियाकलापांचे समन्वय साधणाऱ्यांच्या नावांना पक्षाने मान्यता दिली आहे. त्या राज्यांतील 'भारत जोडो यात्रे'च्या प्रसारमाध्यम उपक्रमांचे समन्वय साधण्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी नेत्यांची नियुक्ती केली आहे. पक्षाची संघटनात्मक व्यवस्था ‘स्वातंत्र्यासह किंवा त्याशिवाय’ निर्धाराने पुढे जात राहील, असेही म्हटले आहे.


 प्रसिद्धी प्रभारींची राज्यनिहाय यादी


काँग्रेसने प्रसिद्धी प्रभारींची राज्यनिहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये शमा मोहम्मद यांना तामिळनाडू आणि डॉली शर्मा यांना आंध्र प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. दुसरीकडे तेलंगणासाठी एसव्ही रमाणी, जम्मू-काश्मीरसाठी अलका लांबा, महाराष्ट्रासाठी शोभा ओझा, राजस्थानसाठी विभाकर शास्त्री, पंजाबसाठी अंशुल अभिजित आणि मध्य प्रदेशसाठी रागिणी नायक यांना प्रभारी बनवण्यात आले आहे.


राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची तयारी सुरु 


काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर प्रवासाला सुरुवात करणार आहेत. राहुल यांचा प्रवास पुढील वर्षी निवडणूक होणाऱ्या राजस्थानमधूनही होणार आहे. निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या यात्रेत राज्यातील ग्राउंड रिअॅलिटी पाहण्याची संधी राहुल गांधी यांना मिळणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही यात्रा राजस्थानमध्ये पोहोचणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या: