Sonia Gandhi : काँग्रेसच्या काही नाराज आमदारांनी दिल्लीत सोनिया गांधी ( Sonia Gandhi) यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान आमदारांनी आपल्या अनेक व्यथा हायकमांडसमोर मांडल्या आहेत. या बैठकीत काँग्रेसच्या मंत्र्यांनीबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात काँग्रेसच्या आमदारांबद्दल चर्चा सरु आहे. दरम्यान, या भेटीत सोनिया गांधी यांनी देखील आमदारांना काही प्रश्न विचारले आहेत. सोनिया गांधींनी नेमके कोणते प्रश्न आमदारांना विचारले ते पाहुयात....
सोनिया गांधींचे आमदारांना प्रश्न
आमदारांची बैठक होते का?
जिल्ह्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या मागे त्या जिल्ह्याचे किती आमदार आहेत? त्याचा आढावा
संघटन आणि मंत्री यांच्यात किती ताळमेळ आहे
कॅबिनेटमध्ये कॉमन मिनीमम कार्यक्रमाला किती प्राधान्य मिळते
कॅबिनेटच्या आधी मंत्री, प्रदेशाध्यक्ष किंवा आमदारांबरोबर प्रश्न समजून घ्यायला बसतात का
असे प्रश्न या भेटीत सोनिया गांधी यांनी आमदारांना विचारले आहेत. आमदारांची नियमीत बैठक होते का? महाविकास आघाडीचा जो कॉमन मिनीमम कार्यक्रम ठरला आहे, त्याला किती प्राधान्य मिळते असे देखील सोनिया गांधी आमदारांना विचारले आहे.
काँग्रेसच्या आमदारांना सोनिया गांधींनी दिलेल्या भेटीची वैशिष्ट्ये
- काँग्रेसचे जवळपास 20 आमदार या बैठकीसाठी उपस्थित होते
- संध्याकाळी सात ते साडेसात जवळपास अर्धा तास बैठक
- या बैठकीत काँग्रेसच्या मंत्र्यांबद्दल नाराजी, पालकमंत्री आपल्याच आमदारांचं काम करत नाहीत लक्ष देत नाहीत अशा तक्रारी
- इतर पक्षाचे नेते त्यांच्या आमदारांचं नेतृत्व कणखरपणे करतात काँग्रेसमध्ये ही उणीव
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा आक्रमकपणे रेटला जात नाही
- अडीच वर्षांपासून महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत, संघटन वाढीसाठी आमदारांना ताकद मिळणं गरजेचं
- कालच्या बैठकीत आमदारांचं म्हणणं सोनिया गांधींनी पूर्णपणे ऐकून घेतलं
- काय आहेत तुमचे मुद्दे, काय आहे मनात ते सांगा असं जवळपास सहा ते सात वेळा बैठकीत त्या म्हणाल्या
- यावेळी काही प्रमुख आमदार बोलले, यामध्ये संग्राम थोपटे, कुणाल पाटील, कैलास गोरंट्याल यांचा समावेश आहे
महत्त्वाच्या बातम्या:
- Congress : प्रत्येक आमदारांशी चर्चा करणार; सोनिया गांधींचे नाराज आमदारांना आश्वासन
- Faisal Patel : माझ्यासमोरील सर्व पर्याय खुले; अहमद पटेलांच्या मुलाचे काँग्रेस सोडण्याचे संकेत