कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापुरातील सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यामुळे, कालपासूनच कोल्हापुरात (Kolhapur)गादी आणि मोदी अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मान देऊ गादीला, मत देऊ मोदीला.. अशी घोषणा करत कोल्हापुराकरांना साद घातली. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोदींचं गुणगान करत, महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे मराठीतून केली. कोल्हापूरची आई अंबाबाईला वंदन करुन मोदींनी कोल्हापूर हा फुटबॉल प्लेअर्संचा जिल्हा आहे. जगात भारी, कोल्हापुरी असे कौतुकही मोदींने आपल्या भाषातून केले. यावेळी, मोदींनी इंडिया आघाडीवर टीका करताना, काँग्रेसकडून काही विशिष्ट समाजाला धरुन व्होट बँकचं राजकारण केलं जात असल्याचं मोदींनी म्हटलं. 


मोदींनी आपल्या भाषणात कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा दाखल देत, काँग्रेसने व्होट बँकेसाठी मुसलमानांना ओबीसीतून आरक्षण दिलं. कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, त्यामुळे राज्यातील ओबीसींवर अन्याय झाला. काँग्रेसला देशभर हाच फॉर्म्युला वापरायचा आहे, धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकार बनावो आणि नोट कमाओ हा काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा अजेंडा आहे, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. दरम्यान, यापूर्वीच्या रामटेक येथील भाषणातही मोदींनी जादा बच्चे पैदा करनेवालों का काँग्रेस लाभ दिलाना चाहती है, असे म्हणत काँग्रेसच्या धार्मिक राजकारणावर भाष्य केलं होतं. 


काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षणाच्या कर्नाटक मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल : मोदी


कोल्हापूर येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एक नवा मुद्दा प्रचारात आणला. मोदींनी सांगितले की, देशात काँग्रेसची सत्ता आल्यास देशभरात आरक्षणाच्या कर्नाटक मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने ओबीसी कोट्यातील २७ टक्के आरक्षण रातोरात कागदपत्रांवर शिक्के मारुन मुस्लिमांना देऊन टाकले. त्यामुळे एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी कोट्यातील २७ टक्के आरक्षण लागू झाले. त्यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्णपणे लुटले. २०१२ मध्ये काँग्रेस सरकारने हा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरला. आता काँग्रेसला संविधान बदलून दलित आणि मागासांचं आरक्षण मुस्लिमांना द्यायचे आहे. काँग्रेस नव्याने हा प्रयत्न करणार असेल तर तुम्ही हे खपवून घेणार का, असा सवाल मोदींनी उपस्थित केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण मुद्दे


कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं


त्यामुळे ओबीसींवर अन्याय झाला


हाच फॉर्म्युला त्यांना देशभर वापरायचा आहे


धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय


सरकार बनावो आणि नोट कमाओ हा काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा अजेंडा आहे


भाजप तरुणांना अधिक संधी देणार आहे... बिना व्याज 20 लाख कर्ज दिलं जाणार आहे


महिलांची सुरक्षा ही मोदींची गॅरेटीं आहे


3 करोड महिलांना लखपती महिला बनवण्याचा प्रयत्न करत आहे


महाराष्ट्र सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे


कोल्हापूरला वंदे भारत ट्रेन दिली आहे


अंबाबाई विकास आराखडा बनवण्यात आला


लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत


7 मे रोजी संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मोठ्या संख्येने मत देऊन मोदींचे हात बळकट करा


या दोन्ही उमेदवारांना मत म्हणजे थेट मोदींना मत असणार आहे...


माझं एक काम करा...भेटेल त्याला सांगा मोदींना मताच्या रूपाने आशीर्वाद द्यायला


तुमचा आशीर्वाद हीच माझी प्रेरणा आहे






 


हेही वाचा


Mahayuti Rally in Kolhapur : कोल्हापुरात शाहू महाराजांचा थेट उल्लेख मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी सपशेल टाळला