राहुल गांधींना पप्पू म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याचं निलंबन
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2017 07:57 AM (IST)
नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पप्पू म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याचं निलंबन करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील मेरठचे जिल्हाध्यक्ष विनय प्रधान यांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये राहुल गांधींचा पप्पू म्हणून उल्लेख केला होता. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पप्पू म्हणून उल्लेख केलेली विनय प्रधान यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. या पोस्टनंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली होती. त्यानंतर विनय प्रधान यांचं तातडीने निलंबन करण्यात आलं. विनय प्रधान यांनी या पोस्टमध्ये राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. मात्र पोस्टमध्ये पप्पू असा उल्लेख केल्याने काँग्रेसमधून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. ज्यामुळे विनय प्रधान यांचं निलंबन करण्यात आलं.