Rahul Gandhi New Look in Britain: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) सात दिवसांच्या यूके दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठात (Cambridge University) राहुल गांधी (Rahul Gandhi) व्याख्यान देणार आहेत. पण या व्याख्यानापूर्वी राहुल गांधींचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये राहुल गांधी एका नव्या लूकमध्ये दिसत आहेत. राहुल गांधीच्या नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. फोटोमध्ये राहुल गांधींनी संपूर्ण लूक चेंज केल्याचं पाहायला मिळत आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) राहुल गांधींच्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. यावरुन विरोधकांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला होता. कधी कडाक्याच्या थंडीतील त्यांचा व्हाईट टी-शर्ट लूक, तर कधी त्यांची पांढरी दाढी चर्चेत राहिली आहे. अशातच सध्या राहुल गांधींचा जेंटलमन लूक चर्चेचा विषय ठरत आहे.
भारत जोडो यात्रेनंतर आता राहुल गांधींनी पुन्हा आपला लूक बदलला आहे. सध्या त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये राहुल गांधी सुटाबुटात दिसत असून त्यांनी दाढी ट्रिम केल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, कोट-टायमधील राहुल गांधींचा जेंटलमन लूक राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनला आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्त्वात भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पार पडला. पहिल्या टप्प्यात तब्बल 3570 किलोमीटरचा प्रवास राहुल गांधींनी केला. या प्रवासादरम्यान राहुल गांधींचा पांढऱ्या टी-शर्टमधील लूक विशेष चर्चेचा विषय बनला होता. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी दाढीही खूप वाढवली होती. आता राहुल गांधी ब्रिटनमध्ये नव्या रुपात दिसून आले आहेत.
भारतीयांनाही संबोधित करणार राहुल गांधी
राहुल गांधी 7 दिवसांच्या यूके दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात केंब्रिज विद्यापीठातील व्याख्यानाने होणार आहे. केंब्रिज बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी राहुल गांधी 'लर्निंग टू लिसन इन द 21वी सेंच्युरी' या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित करतील. यादरम्यान ते 'बिग डेटा अँड डेमोक्रसी' आणि 'इंडिया चायना रिलेशन्स' यावरही बोलणार आहेत. यावेळी ते केंब्रिजमधील भारतीयांनाही संबोधित करणार आहे.
केंब्रिज जेबीएसने ट्वीट केलं आहे की, "भारताचे प्रमुख विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे स्वागत करताना आमच्या केंब्रिजला आनंद होत आहे. ते आज केंब्रिज जेबीएसमध्ये 'लर्निंग टू लिसन इन द 21वी सेंच्युरी' या विषयावर संबोधित करतील."
लोकशाही आणि भारत-चीन संबंधांवरही बोलणार
केंब्रिज बिझनेस स्कूलमध्ये राहुल गांधी यांचे व्याख्यान होणार आहे. बिग डेटा, लोकशाही आणि भारत-चीन संबंधांवरही ते बोलणार आहेत. यावर राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलं की, "मी माझ्या केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तिथे व्याख्यान देण्यास उत्सुक आहे. मी तिथल्या बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांनाही संबोधित करेन. यादरम्यान भौगोलिक राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, डेटा आणि लोकशाही यासह अनेक विषयांवर बोलणार आहे."