Rahul Gandhi on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी आज राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर चांगलाच हल्लाबोल केला होता. नरेंद्र मोदी यांच्या या टीकेला आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उत्तर दिले आहे. 

Continues below advertisement

"काँग्रेस पक्ष सत्य बोलत आहे. त्यामुळे पंतप्रधान काँग्रेसला घाबरत आहेत. त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यांचा पूर्ण व्यवसाय मार्केटिंगचा आहे. त्यांच्यातील भीती आजच्या भाषणातून दिसली. राज्यसभेतील संपूर्ण भाषण काँग्रेसवर आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावरच होतं. काँग्रेसने काय केले नाही, हे मोदींनी सांगितले. परंतु, भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत त्यावर ते काही बोलले नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.  

राहुल गांधी म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण आयुष्यभर देशाची सेवा केली. त्यांच्याबद्दल कोणी प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. गांधी कुटंबातील अनेकांनी देशासाठी योगदान दिले आहे. मी बोललेल्या तीन गोष्टींवर नरेंद्र मोदी यांनी काही उत्तर दिले नाही. मी म्हणालो होतो की, 'दोन हिंदुस्थान बनवले जात आहेत, त्यापैकी एक करोडो लोकांसाठी आहे आणि दुसरा काही श्रीमंत लोकांसाठी आहे. त्याबरोबरच आमच्या सर्व संस्था एकापाठोपाठ एक काबीज केल्या जात आहेत, त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे. तिसरी गोष्ट अशी की, पंतप्रधानांच्या दिवाळखोर परराष्ट्र धोरणामुळे चीन आणि पाकिस्तान एक झाले आहेत, ही देशासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे."  

Continues below advertisement

काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी? "काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता. काँग्रेसमुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.   

"काँग्रेसला फक्त उपदेश देण्याची सवय आहे, असा आरोप करत नरेंद्र मोदी म्हणाले, "देशात काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार झाला नसता, सरकार अस्थिर करणं हेच काँग्रेसचं काम आहे. राष्ट्रीय या शब्दावर काँग्रेसला आक्षेप आहे तर काँग्रेसने पक्षाचं नाव बदलून आपल्या पूर्वजांची चूक सुधारली पाहिजे. काँग्रेस नसती तर काश्मीरच्या पंडितांना काश्मीर सोडावा लागला नसता. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी देशाचा विकास केला नाही, आता विरोधात आहे तर विकासात अडथळा आणत आहेत,  केंद्रात सत्ता असताना काँग्रेसने 50 पेक्षा जास्त राज्य सरकारे बरखास्त केली असा आरोप नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर केला.  

PM Modi : देशातली राज्य सरकारं अस्थिर करणं हीच काँग्रेस हायकमांडची नीती : पंतप्रधान : Rajya Sabha

महत्वाच्या बातम्या