Navjot Singh Sidhu in Jail : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू  (Navjot Singh Sidhu) हे न्यायालयात शरण आल्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्यानंतर शुक्रवारी (20 मे)  त्यांची तुरुंगात पहिली रात्र गेली. सिद्धू यांना पटियाला मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे. येथे त्यांना कैदी क्रमांक देण्यात आला आहे. सिद्धू यांना न्यालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.



सिद्धूसोबत आणखी चार कैदी उपस्थित 


नवज्योतसिंग सिद्धू यांना तुरुंगात कैदी क्रमांक 241383 हा दिला आहे. त्यांना मध्यवर्ती सुधारगृहात 10×15 कक्ष देण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांच्यासोबत आणखी चार कैदीही आहेत. या कैद्यांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेले दोन माजी पोलिस आणि दोन नागरिक आहेत.


रात्रीचे जेवण नाही


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवज्योत सिंग सिद्धू यांनी तुरुंगात पोहोचल्यानंतर पहिल्या रात्री जेवण केले नाही. शुक्रवारी संध्याकाळी वैद्यकीय चाचणीदरम्यान त्यांनी जेवण केले होते. त्यानंतर त्यांनी कारागृहात जेवण करण्यास नकार दिला होता. सिद्धू यांना सामान्य कैद्यांप्रमाणे तुरुंगात ठेवण्यात आले आहे. सूत्रांकडून सांगण्यात आले की, सिद्धू यांना गव्हाची अॅलर्जी आहे, त्यामुळे त्यांची आज तुरुंगात चाचणी होऊ शकते.


सिद्धूने न्यायालयात आत्मसमर्पण केले होते


1988 च्या 'रोड रेज' प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. एक वर्षाच्या शिक्षेनंतर शुक्रवारी (20 मे) नवज्योत सिंह सिद्धू यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले. सिद्धू यांनी दुपारी 4 नंतर आत्मसमर्पण केले आणि तिथून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी माता कौशल्या रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांची रवानगी पटियाला मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. नवतेज सिंग चीमा, अश्विनी सेखरी, हरदयाल सिंग कंबोज आणि पिरामल सिंग आणि त्यांच्या समर्थकांसह सिद्धू त्यांच्या निवासस्थानातून न्यायालयात गेले. यापूर्वी सिद्धूने सुप्रीम कोर्टाकडे आत्मसमर्पणासाठी वेळ मागितला होता. मात्र, त्यांच्या मागणीवर सुनावणी झाली नाही. त्यानंतर सिद्धूने आत्मसमर्पण केले.


प्रकरण नेमकं काय?


27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंह संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 1.5 किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरु होऊन फक्त एक वर्ष झाले होते. त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंह यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंहला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते. 


महत्वाच्या बातम्या: