Congress leader Manish Tiwari on 26/11 attack : मुंबई 26/11 हल्ल्यानंतर तत्कालीन युपीए सरकारने पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता होती असे काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. मनिष तिवारी यांनी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर प्रश्न उभे केले आहेत. मनिष तिवारी यांनी 26/11 हल्ल्याबाबत आपल्या एका पुस्तकात हा दावा केला आहे.
काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी 10 Flash Points, 20 Years या आगामी पुस्तकात मनमोहन सिंग सरकारवर प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या वेळी देशाला त्वरीत आणि कठोर कारवाई करण्याची आवश्यकता होती. एक अशी वेळ येते, ज्यावेळी शब्दांपेक्षा कारवाई करणे अधिक गरजेची असते. 26/11 ही तिच वेळ होती. ज्यावेळी कारवाई करणे आवश्यक होती. मनिष तिवारी यांनी मुंबई 26/11 हल्ल्याची तुलना अमेरिकेच्या 9/11 हल्ल्याशी केली. भारतानेदेखील अमेरिकेप्रमाणे कारवाई करायला हवी होती.
पुस्तकात मागील दोन दशकातील घटनांचा उल्लेख
मनिष तिवारी यांनी पुस्तकाबाबत म्हटले की, माझे चौथे पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकात मागील दोन दशकात भारतासमोर आलेल्या प्रत्येक राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांचा आढावा घेतला आहे.
या आधीही पक्षावर टीका
मनिष तिवारी यांनी यादेखील आपल्याच काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. पंजाबच्या राजकीय अस्थिरतेवरही भाष्य करताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमारने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्याच्या पक्ष प्रवेशाबाबत मनिष तिवारी यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
भाजपला टीकेची आयती संधी
मनिष तिवारी यांच्या पुस्तकातील या दाव्यामुळे भाजपला काँग्रेसवर टीका करण्याची आयती संधी मिळाली असल्याचे म्हटले जात आहे. भाजप प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
मनिष तिवारी यांनी काँग्रेस नेतृत्वातील युपीए सरकारवर प्रहार केला आहे. हवाई दल प्रमुखांनीदेखील या हल्ल्याविरोधात कारवाई करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, सरकारने नकार दिला होता. उरी, पुलवामा हल्ल्यानंतर ज्याप्रमाणे कठोर कारवाई केली. तशीच कारवाई 26/11 हल्ल्यानंतर का झाली नाही, असा प्रश्नही पुनावाला यांनी विचारला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
पवारसाहेब तुमच्यासाठी जीव देईन, पण मला माफ करा : शशिकांत शिंदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha