काँग्रेसच्या सर्व प्रवक्त्यांना टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये सहभागी न होण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे स्पंदना पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करुन सर्व वृत्तवाहिन्यांना आणि संपादकांना विनंती केली होती की, काँग्रेस प्रतिनिधींना तुमच्या चॅनेलवरीनल चर्चासत्रांमध्ये बोलवू नका.
काही ठिकाणी चर्चा सुरु आहे की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे दिव्या सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु याबाबत दिव्या यांना विचारले असता त्यांनी या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस पक्षाला सोशल मीडियावर मजबूत बनवणाऱ्यांमध्ये दिव्या स्पंदना यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
काय केलं होतं ट्वीट
स्पंदना यांनी निर्मला सीतारमण यांना शुभेच्छा देण्यासाठी ट्वीट केले होते की, "इंदिरा गांधीनंतर पहिल्यांदाच देशाने अर्थमंत्रालयाची जबाबदारी एका महिलेच्या खांद्यावर सोपवली आहे. ही गोष्टी देशातल्या महिलांचा गौरव करणारी आहे. सध्याचा देशाचा आर्थिक विकासदर चांगला नाही. परंतु मला विश्वास आहे की, तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला पुनर्जीवित कराल. तुम्हाला आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. शुभेच्छा."