पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी महाआघाडीतील जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.विश्वसनीय सूत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार एक फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. ज्यानुसार सीपीआय माले पक्षाला 20 जागा तर मुकेश साहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीला जागा दिल्या जातील. दुसरीकडे काँग्रेसनं बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं गुरुवारी रात्री उशिरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यातील 24 उमेदवार पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातील आहेत.
काँग्रेसची 48 उमेदवारांची यादी
बगहा- जयेश मंगल सिंह
नौतन- अमित गिरि
चनपटिया- अभिषेक रंजन
बेतिया- वासी अहमद
रक्सौल- श्याम बिहारी प्रसाद
गोविंदगंज- शशि भूषण राय
रीगा- अमित कुमार सिंह टुन्ना
बथनाहा- नलिनी रंजन झा
फुलपरास- सुबोध मंडल
फारबिसगंज- मनोज बिस्वास
बहादुरगंज- प्रो. मशवर आलम
कदवा- शकील अहमद खान
मनिहारी- मनोहर प्रसाद सिंह
कोढ़ा- पूनम पासवान
सोनबरसा- सरीता देवी
बेनीपुर- मिथिलेश कुमार चौधरी
सकरा- उमेश राम
मुजफ्फरपुर- विजेंद्र चौधरी
गोपालगंज- ओम प्रकाश गर्ग
कुचायकोट- हरि नारायण कुशवाह
लालगंज- आदित्य कुमार राजा
वैशाली- इंजीनियर संजीव सिंह
राजापाकड़- प्रतिमा कुमारी
रोसड़ा- ब्रज किशोर रवी
बछवाड़ा- शिव प्रकाश गरीब दास
बेगूसराय- अमिता भूषण
खगड़िया- डॉ. चंदन यादव
बेलदौर- मिथिलेस कुमार निषाद
भागलपुर- अजित कुमार शर्मा
सुल्तानगंज- ललन यादव
अमरपुर- जितेंद्र सिंह
लखीसराय- अमरेश कुमार
बरबीघा- त्रिशूलधारी सिंह
बिहारशरीफ- ओमैर खान
नालंदा- कौशलेंद्र कुमार
हरनौत- अरुण कुमार बिंद
कुम्हरार- इंद्रदीप चंद्रवंशी
पटना साहिब- शशांत शेखर
बिक्रम- अनिल कुमार सिंह
बक्सर- संजय कुमार तिवारी
राजपुर- विश्वनाथ राम
चेनारी- मंगल राम
करगहर- संतोष मिश्रा
कुटुंबा- राजेश राम
औरंगाबाद- आनंद शंकर सिंह
वजीरगंज- अवधेश कुमार सिंह
हिसुआ- नीतू कुमारी
मुकेश साहनी यांना किती जागा मिळणार?
एनडीएवर नाराज असलेल्या मुकेश साहनी यांना महाआघाडीतून 15 जागा सोडल्या जातील. तर, सीपीआय माले पक्षाला 20 जागा दिल्या जाणार आहेत. साहनी महाआघाडीत आल्यानं मल्लाह आणि निषाद समुदायाची मतं महाआघाडीला मिळू शकतात. मात्र, जागा वाटपासंदर्भात अधिकृत घोषणा अद्याप महाआघाडीकडून झालेली नाही. सीपीआय माले या पक्षानं गेल्या विधानसभा निवडणुकीत 12 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी ते 20 जागा लढवत आहेत. मुकेश साहनी सोबत असल्याचा फायदा देखील महाआघाडीला होण्याची शक्यता आहे. एनडीएच्या EBC मतदारांमध्ये पोहोचण्यासाठी महाआघाडीला मुकेश साहनी महत्त्वाचे आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदानं 6 नोव्हेंबर तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान 11 नोव्हेंबरला होईल. तर निकाल 14 नोव्हेंबरला असेल.