Cockroach in Air Vistara Airlines : एअर विस्तारा एअरलाईनच्या (Air Vistara Airlines) विमानात एका प्रवाशाला जेवणात झुरळ आढळलं. विस्तारातील या प्रवाशाने झुरळ आढळलेल्या जेवणाचा फोटो ट्विटर करत शेअर केला. या फोटोमध्ये जेवणात झुरळ असल्याचं दिसून येत आहे. विस्तारा एअरलाईनमधून निकुल सोलंकी प्रवास करत होते, त्यांना विमानात देण्यात आलेल्या नाश्त्यामध्ये झुरळ आढळून आलं. त्यांनी ट्विट करत सांगितलं की, 'एअर विस्ताराच्या जेवणात झुरळ होतं.'


प्रवाशाला जेवणात आढळलं झुरळ


प्रवासी निकुल सोलंकी (Nikul Solanki) यांनी जेवणाचा फोटो ट्विटरवर शेअर करत सांगितलं की, विस्तारा एअरलाईन्समधील जेवणात झुरळ आढळलं. निकुल यांनी दोन फोटो पोस्ट केले होते. यामध्ये एका फोटोमध्ये इडली सांबर आणि उपमा दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये उपम्यामध्ये जेवणासोबत तळलेला झुरळ फोटो झूम करून काढण्यात आल्याचं दिसत आहे.






विस्तारा एअरलाईन्सने घेतली प्रकरणाची दखल


निकुल सोलंकी यांच्या ट्विटनंतर 10 मिनिटांनी विस्तारा एअरलाईन्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून (Vistara - @airvistara)निकुल यांनी प्रतिक्रिया मिळाली. विस्तारा एअरलाईन्सने ट्विट करत म्हटलं आहे की, 'नमस्कार निकुल, आमच्या एअरलाईन्समधील सर्व जेवण सर्वोत्तम दर्जा लक्षात घेऊन तयार केलं जातं. कृपया आम्हाला तुमच्या फ्लाइटचा तपशील मेसेजवर पाठवा, म्हणजे आम्ही या प्रकरणात अधिक लक्ष देऊन आणि लवकरात लवकर समस्येचं निराकरण करू शकू. धन्यवाद.'






या प्रकरणाची एअर विस्तारा एअरलाईन्सने दखल घेतली असून, लवकरच या प्रकरणाबाबत अधिक माहिती समोर येईल. दरम्यान, या प्रकरणावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नेटकऱ्यांनी अन्नसुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आता या प्रकरणात विस्तारा एअरलाईन्सकडून काय स्पष्टीकरण समोर येतं, हे पाहावं लागेल.