चेन्नई: एखादं झुरळ तुमच्या नाकावाटे चक्क डोक्यात शिरु शकतं, असं सांगितलं तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण ही घटना चेन्नईतल्या एका 42 वर्षीय महिलेच्या बाबतीत घडली आहे.
या महिलेला डोळ्यांच्या मागे काही हालचाल होत असल्याचं जाणवलं. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर तात्पुरता इलाज केला. मात्र तरीही त्रास होऊ लागल्यानं तज्ज्ञांकडे गेल्यावर तपासणी केली. तेव्हा तिच्या डोक्यात चक्क झुरळ असल्याचं लक्षात आलं.
त्यानंतर डॉ. एम.एन शंकर यांनी 45 मिनिटं यशस्वी शस्त्रक्रिया करत डोक्यातून झुरळाला जिवंतपणे बाहेर काढलं.
दरम्यान, महिलेची तब्येत चांगली आहे. पण महिलेच्या डोक्यात झुरळही शिरु शकतं, यावर महिलेसोबत डॉक्टरांचाही विश्वास बसत नव्हता.