तिरुअनंतपुरम/ केरळ : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडीओ एक नाग चक्क कोंबडीची अंडी देताना दिसत आहे. केरळमधील सर्पमित्राने हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.


केरळमध्ये एका शेतातील कोंबड्यांच्या खुराड्यात नाग शिरला. या नागाने कोंबडीला मारुन टाकलं, तर तिची सर्व अंडी फस्त केली. यानंतर तो खुराड्यात निपचिप्त पडला होता.

त्याला खुराड्यातून बाहेर काढण्यासाठी सुजीत नावाच्या सर्पमित्राला बोलावण्यात आलं. त्याने नागाला खुराड्यातून बाहेर काढल्यानंतर, नागाने फस्त केलेली अंडी बाहेर काढली, आणि तो जंगलात पसार झाला.

सुजीतच्या मते, एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर साप किंवा नाग निपचिप्त पडतो. या परिस्थितीत तो कधीही पलटवार करत नाही. उलट आपल्या जीवाचा धोका टाळण्यासाठी तो खालेला पदार्थ बाहेर काढतो, आणि कुणालाही नुकसान न करता, तो आपल्या वाटेने निघून जातो.

व्हिडीओ पाहा