छत्तीसगडच्या बिजापूर येथे चकमकीच्या वेळी 3 एप्रिल रोजी अपहरण झालेल्या सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंगला गुरुवारी नक्षलवाद्यांनी मुक्त केले. राकेश्वर सिंहला सोडल्याची बातमी कळताच त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. एबीपी न्यूजशी बोलताना मागील काही दिवसांची आठवण सांगताना राकेश्वर सिंग यांची पत्नी खूपच भावनिक झाली. ती म्हणाली की, मागील सहा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा काळ होता. राकेश्वर सिंहच्या परत येण्याची मी कधीही आशा सोडली नाही आणि ते नक्की परत येईल असा मला विश्वास होता, अशी प्रतिक्रिया राकेश्वरच्या पत्नीने दिली.


राकेश्वर यांच्या पत्नीने मानले सरकारचे आभार


"ज्यांनी माझ्या पतीची सुरक्षित सुटका केली आहे, त्यांचे मी आभार मानते. हा अविस्मरणीय क्षण मी कधीही विसरणार नाही." सर्वात कठीण दिवस रविवारचा होता, कारण त्यादिवशी माझा पती बेपत्ता झाला होता. तो जिवंत आहे की नाही आणि असला तर कोणत्या परिस्थितीत आहे? याबद्दल मला काहीच माहित नव्हतं. अशा कठीण काळात माझ्या कुटुंबाचे मला खूप मोठे पाठबळ मिळाले असल्याचे राकेश्वर सिंहची पत्नीने सांगितले.


राकेश्वर सिंहगची पत्नी म्हणाली, मी खूप घाबरले होते
रविवारी बिजापूरमध्ये सैनिकांचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच ती खूप घाबरली असल्याचे राकेश्वर सिंह यांच्या पत्नीने सांगितले. या सैनिकांच्या मृतदेहांमध्ये तिच्या पतीचाही मृतदेह मिळेल असं तिला वाटलं. मात्र, मृत्यू झालेल्या सैनिकांची यादी संध्याकाळी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये तो बेपत्ता असल्याचे सांगितले गेले. सोबतच त्याचा शोध घेण्यात येईल असेही सांगण्यात आले. पती सुरक्षित सुटल्यानंतर ती आता पूर्णपणे समाधानी असल्याचे तिने सांगितले.






यासह राकेश्वर सिंहच्या मुलीने सांगितले की माझे वडील लवकरात लवकर घरी यावेत अशी माझी इच्छा आहे. आपल्या मुलाची सुटका झाल्याची बातमी ऐकताच राकेश्वर सिंहच्या आईने सांगितले की तिच्यासाठी सहा दिवस खूप कठीण होते. त्या म्हणाल्या की आज त्या खूप खूष आहे. कारण राकेश्वरच्या सुटकेची बातमी मिळाली आहे. त्या म्हणाल्या की त्यांच्या मुलाला प्रत्येकाचे आशीर्वाद मिळाले आणि सरकारने त्यांच्या कुटुंबासाठी सर्व काही केले.


3 एप्रिल रोजी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांवर हल्ला करून नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह मनहासला ओलीस ठेवले होते. चकमकी दरम्यान सुरक्षा दलाचे 22 जवान शहीद झाले तर 31 इतर सैनिक जखमी झाले. शहीद जवानांमध्ये सीआरपीएफच्या कोबरा बटालियनचे 7 जवान, सीआरपीएफच्या बस्तरिया बटालियनचा 1 जवान, डीआरजीचे 8 जवान आणि एसटीएफचे 6 जवानांचा समावेश आहे.