'नीट'प्रश्नी मुख्यमंत्री आज पंतप्रधानांची भेट घेणार
एबीपी माझा वेब टीम | 18 May 2016 02:23 AM (IST)
मुंबई : 'नीट' परीक्षेबाबत तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. या भेटीत मुख्यमंत्री राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न मोदींसमोर मांडतील. शिवाय 'नीट' प्रश्नी केंद्र सरकारने तोडगा काढावा, अशी विनंतीही मुख्यमंत्री मोदींना करणार आहेत. 'नीट' परीक्षेच्या घोळाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थी आणि पालकांसह दोन दिवसांपूर्वी 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी नीटबाबत पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. यावेळी 'नीट'प्रश्नी केंद्र सरकार काही करु शकेल का, अशी विनंती पंतप्रधानांना करणार असल्याचं आश्वासन फडवणीस यांनी विद्यार्थ्यांना दिलं होतं.