Himachal Pradesh Cloudburst : हिमाचल प्रदेशातील किन्नौरमधील शलखर गावात सोमवारी ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. ढगफुटीमुळे मोठा पूर येऊन दुर्घटना घडली. या पुरात जीवितहानी झालेली नाही. पण अनेक वाहनं प्रवाहासोबत वाहून गेली आहेत. तर इतर ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. पुराच्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर याचं वास्तव समोर आलं. ढगफुटीमुळे डोंगरावरून पुराचं पाणी वेगानं शलखर गावात घुसलं. यामुळे भरपूर नुकसान झालं आहे.


पुरात सर्व काही वाहून गेलं
ढगफुटीमुळे पूर आल्याने शलखर गावातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले. पुरात सर्व काही वाहून गेलं. पूर आलेल्या  ठिकाणी विध्वंस पाहायला मिळतोय. सामडो चेक पोस्चपासून पूहच्या दिशेने सुमारे सात किलोमीटर अंतरावर ही ढगफुटीची दुर्घटना घडली आहे. निसर्गाच्या कोपामुळे अनेकांची घरं वाहून गेली. सुदैवानं लोकांचे प्राण वाचले. पण ढिगाऱ्याखाली अनेक संसार अडकले आहेत.




 


ढिगाऱ्याखाली अनेक वाहनं अडकली
पुरामुळे परिसरातील मंदिरांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली आणि चिखलामध्ये अडकल्या आहेत. पूर ओसरला असला तरी परिसरात भीतीचं वातावरण आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या