नवी दिल्ली : पंधरा लाख टन कच्ची साखर जानेवारी महिन्यात चीनला निर्यात होणार आहे. दोन देशांदरम्यानची व्यापारी तूट भरून काढण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग बासमती नंतर चीनने भारताची साखर खरेदी केली. वाणिज्य विभागाचे प्रतिनिधी मंडळ पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान चीनमध्ये होते त्या शिष्टमंडळाशी चीन सरकारचा करार झाला आहे.  चीनच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातले ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कच्च्या साखरेच्या निर्यातीमुळे पांढऱ्या साखरेचे उत्पादन कमी होईल बाजारात साखरेचे दर स्थिर राहतील. त्यामुळे ऊस उत्पादकांना एफआरपी किंवा त्याहून अधिक पैसे मिळू शकतात. साखर उद्योगाकडून आजच्या कराराचे जोरदार स्वागत केले आहे. साखरेचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारला एकूण पन्नास लाख टन साखर निर्यात करायची आहे. त्यापैकी वीस लाख टन साखर चीन खरेदी करतोय. वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत भारतीय शुगर मिल्स असोसिएशन आणि चीन सरकार दरम्यान याबाबत करार करण्यात आला.