नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर तिबेटच्या डोंगराळ भागात चीनच्या हालचालींना वेग आला आहे. सिक्कीमजवळच्या डोकलाम भागात भारतीय सैन्याबरोबर तणाव वाढलेला असताना चीननं तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनांची लष्करी सामुग्री पाठवली आहे.
चिनी लष्कराच्या मुखपत्रातून ही माहिती देण्यात आली आहे. पश्चिम थिएटर कमांडने उत्तर तिबेटच्या कुनलून पर्वतरांगामध्ये हजारो टनांची सैन्य सामुग्री पाठवल्याची माहिती आहे.
पश्चिम थिएटर कमांडकडे शिनजियांग आणि तिबेटवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असून हीच कमांड भारताबरोबरचे सीमा विषय हाताळते. चीन गेल्या महिन्यापासून रस्ते आणि रेल्वे मार्गाने ही सैन्य सामुग्री पाठवत आहे.
चीनकडे यादोंगपासून ल्हासापर्यंत पसरलेल्या रेल्वे आणि रस्ते नेटवर्कच्या माध्यमातून लष्करी सामुग्री सिक्कीमच्या नाथू-ला पर्यंत पोहोचवण्याची क्षमता आहे. चीनी सैन्याला एक्सप्रेस वे नेटवर्कच्या माध्यमातून 700 किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी फक्त सहा ते सात दिवस लागू शकतात.
तिबेटच्या डोंगराळ भागात चीनकडून हजारो टन युद्धसामुग्रीची आयात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jul 2017 10:10 PM (IST)
भारत-चीन सीमेवर तिबेटच्या डोंगराळ भागात चीनच्या हालचालींना वेग आला आहे. सिक्कीमजवळच्या डोकलाम भागात भारतीय सैन्याबरोबर तणाव वाढलेला असताना चीननं तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टनांची लष्करी सामुग्री पाठवली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -