लखनौ : उत्तर प्रदेशात रेल्वेने स्कूलबसला दिलेल्या धडकेत सात शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भदोही जिल्ह्यातल्या मेघीपूर गावात असलेल्या रेल्वे फाटकावर क्रॉसिंग दरम्यान हा अपघात घडला.
सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. माधव सिंग रेल्वे स्टेशनजवळ वाराणसी-अलाहाबाद पॅसेंजरने दिलेल्या धडकेत स्कूलबसचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी असल्याची माहिती आहे.
जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून सर्व अपघातग्रस्त विद्यार्थी टेंडर हार्ट स्कूलमध्ये शिकत होते.