लखनऊः जनतेचं लक्ष वेधण्यासाठी भाजप जाणीवपूर्वक आक्षेपार्ह विधानं करत आहे. दयाशंकर सिंह यांच्याकडून मोठा कट रचून आक्षेपार्ह विधान करुन घेतलं, असं सागंत बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भाजपवर सनसनीत टिका केली.


 

 

मायावती यांनी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. दयाशंकरला समोर आणणं हा भाजप आणि समाजवादी पक्षाचा कट होता, असा दावा मायावती यांनी केला. दलित मुलीला शिवीगाळ केल्याप्रकरणी दयाशंकर सिंहला अजून अटक करण्यात का नाही आली, असा सवालही मायावती यांनी केला.

 

 

शिवीगाळ प्रकरणात बसप कार्यकर्त्याला क्लीन चिट

 

 

दरम्यान मायावतींनी आपल्या पक्षातील नसीमुद्दीन सिद्दीकी यांना शिवीगाळ प्रकरणात क्लीन चिट दिली. कार्यकर्त्यांनी दयाशंकरच्या परिवाराला शिवीगाळ केली, असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर सिद्दीकीच्या अटकेची मागणी करण्यात आली होती.

 

 

मात्र सिद्दीकी यांच्या घोषणांता चूकीचा अर्थ लावला गेला, दयाशंकरच्या कुटुंबाची बसपला प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती, असं सांगत मायावती यांनी सिद्दीकीला क्लीन चिट दिली.

 

संबंधित बातम्याः


 

मायावतींपेक्षा वारांगना प्रामाणिक, भाजप नेत्याची मुक्ताफळं


 

भाजप नेत्याकडून मायावतींची वारांगणेशी तुलना, भाजपकडून निलंबनाची कारवाई