Chief Justice of India : सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Dhananjaya Yeshwant Chandrachud) यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 नंतर समाप्त होणार आहे. दरम्यान, चंद्रचूड यांनी त्यांच्यानंतर सरन्यायाधीश पदाची जबाबदारी न्यायमूर्ती खन्ना यांच्याकडे दिली जावी, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारला लिहिलं आहे. न्यायामूर्ती खन्ना हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असल्याने त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. न्यायमूर्ती खन्ना हे 25 मे रोजी निवृत्त होणार आहेत. 1983 मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली होती. 


डी वाय चंद्रचूड (Dhananjaya Yeshwant Chandrachud) 13 मे 2016 रोजी पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनले होते. न्यायमूर्ती खन्ना हे 18 जानेवारी 2019 मध्ये पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनले आहेत. दरम्यान आता चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून खन्ना यांच्याकडे जबाबदारी देण्यात यावी, अशी शिफारस केली आहे. यापूर्वी न्यायामूर्ती खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयातही न्यायाधीश म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. 


न्यायामूर्ती खन्ना 6 महिन्यानंतर निवृत्त होणार 


नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीच्या अधिकृत माहितीनुसार, जस्टीस खन्ना 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. अशात त्यांनी नोव्हेंबरमध्ये पदभार स्वीकारला तर ते सहा महिन्यानंतर निवृत्त होणार आहेत. त्यानंतर सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील न्यायमूर्तींची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


खन्ना यांच्यानंतर कोण होणार सरन्यायाधीश?


जस्टीस खन्ना यांच्यानंतर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचे नाव सरन्यायाधीश पदासाठी चर्चेत आहे. ते मे 2025 मध्ये सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारु शकतात. शिवाय महत्त्वाची बाब म्हणजे ते अनुसूचित जाती प्रवर्गातील दुसरे सरन्यायाधीश असतील. न्यायामूर्ती केजी बालकृष्ण यांच्या रूपाने देशाला पहिल्यांदा दुसरे दलित सरन्यायाधीश मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


न्यायामूर्ती गवई देखील 6 महिन्यानंतर निवृत्त होतील 


विशेष म्हणजे गवई यांनी मे मध्ये सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारल्यास ते देखील 6 महिन्यानंतर निवृत्त होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत माहितीनुसार, 16 मार्च 1985 वकिली व्यवसायास सुरु करणारे न्यायमूर्ती गवई 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. भूषण गवई यांच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे देखील सरन्यायाधीश होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Varun Sardesai: झिशान सिद्दीकींविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीची घोषणा


Sharad Pawar on Jayant Patil : जयंतरावांच्या हातामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकतोय! शरद पवारांच्या इस्लामपुरातील भाषणाची चर्चा!