काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्याशी चर्चा केली होती. त्याचवेळी त्यांनी कौटुंबीक जबाबदाऱ्यांमुळे अमेरिकेला परतणार असल्याचं म्हटलं होतं, असं जेटलींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अरविंद सुब्रमण्यन यांना 16 ऑक्टोबर 2014 रोजी तीन वर्षांसाठी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही मोदी सरकारने त्यांना विनंती करत, 1 वर्षांसाठी त्यांना मुदतवाढ दिली होती.
अरविंद सुब्रमण्यन हे अर्थमंत्री अरुण जेटली यांचे जवळचे मानले जात होते. कोणतीही आर्थिक धोरणं ठरवताना ते सुब्रमण्यन यांचे सल्ला घेत असत.
फेसबुकच्या पोस्टच्या शेवटी जेटली म्हणाले, “वैयक्तिकरित्या मला सुब्रमण्यन यांची बौद्धिक क्षमता, गतीशीलता, ऊर्जा आणि कल्पकतेची कमतरता जाणवेल.
मी एक मंत्री असलो, तरी चांगल्या किंवा कोणत्याही घटना देण्यासाठी ते थेट माझ्या खोलीत येत होते. दिवसातून एकदा किंवा अनेकदा हे चित्र पाहायला मिळत होतं. मात्र आता ते सर्व मी मिस करणार आहे. पण मला माहीत आहे, ते मनाने आमच्यासोबतच असतील. मला विश्वास आहे की ते कुठेही असले तरी आम्हाला विश्लेषण आणि सल्ले देत राहतील.
अरविंद सुब्रमण्यन आणि कुटुंबीयांना शुभेच्छा”