चेन्नई : चेन्नईमध्ये एका भरधाव पोर्शे कारचालकाने रिक्षाचालकाचा बळी घेतला. पोर्शेने दिलेल्या धडकेत 12 रिक्षांचं नुकसान झालं असून एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सोमवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास विकास विजयानंद हा 22 वर्षीय तरुण पोर्शे कार चालवत होता. कॅथेड्रल रोडवर त्याने 12 रिक्षांना धडक दिली. यात 29 वर्षीय रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. कायद्याचा विद्यार्थी असलेला विकास मद्यप्राशन करुन कार चालवत असल्याचा आरोप केला जात आहे.
अपघातात महागड्या पोर्शे कारचाही चक्काचूर झाला आहे. आरोपीने मद्यप्राशन केले होते का, यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत.