नवी दिल्ली : ट्रेनने प्रवास करत असाल आणि ट्रेनचं स्टेटस जाणून घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. याबाबत आयआरसीटीसीने एक घोषणा केली आहे. भारतीय रेल्वेने यासाठी मेक माय ट्रिपसोबत भागीदारी केली आहे, ज्यामुळे तुम्हाला ट्रेनचं लाईव्ह स्टेटस मेसेंजरवरही मिळेल.

ट्रेनचं लाईव्ह स्टेटस काय आहे हे तुम्हाला व्हॉट्सअॅपवरही समजणार आहे. याशिवाय पुढील स्टेशन कोणतं आहे, कोणतं स्टेशन येऊन गेलं याचीही माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला आता 139 क्रमांक डायल करावा लागणार नाही, किंवा इतर कोणतं अॅप घेण्याचीही गरज नाही.

ट्रेनचं स्टेटस व्हॉट्सअॅपवर कसं मिळणार?

तुमचं व्हॉट्सअॅप अपडेट करा, जेणकेरुन नवीन व्हर्जन तुम्हाला मिळेल.

व्हॉट्सअॅपवर माहिती जाणून घेण्यासाठी मेक माय ट्रिपचा 7349389104 हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल.

व्हॉट्सअॅपमधून मेक माय ट्रिपचा क्रमांक ओपन करा. त्यामध्ये ट्रेनचा नंबर टाईप करुन मेसेज सेंड करा. मेसेज पाठवताच तुम्हाला हवं असलेल्या ट्रेनचं स्टेटस मिळेल.

याच पद्धतीने पीएनआर नंबर व्हॉट्सअॅपवर मेसेज करा. यामुळे तुम्हाला तुमच्या तिकिटाचं स्टेटसही मिळेल.