रायपूर: सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 25 जवान शहीद झाले आहेत. मात्र हा हल्ला म्हणजे गुप्तचर खात्याचं अपयश आणि मोठी चूक असल्याचं सांगण्यात येत आहे.

45 दिवसांपूर्वीच नक्षलींनी जवानांवर हल्ला केला होता. मात्र या हल्ल्यातून काहीच धडा घेतला गेला नाही. नक्षली भागात रस्ता बनवणं जवानांच्या जीवावर बेतलं. 

गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ABP न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, नक्षली हल्लाबाबत काहीही गुप्त माहिती मिळाली नव्हती. 11 मार्चलाही इथे सीआरपीएफ जवानांना नक्षल्यांनी लक्ष्य केलं होतं. मात्र त्यानंतर काहीच दिवसात इतका मोठा हल्ला झाल्याने, गुप्तचर खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

5 नक्षल्यांना ठार करणारे जवान शेर मोहम्मद जखमी


11 मार्चनंतर काल पुन्हा हल्ला झाला. मात्र या 45 दिवसात नक्षलींची काहीच कुजबूज गुप्तचर खात्याला कशी कळली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

याप्रकरणी आता चौकशी सुरु झाली आहे. तर तिकडे सीआरपीएफच्या डीजींना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.

25 जवान शहीद 

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सोमवारी 24 एप्रिलला नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले.  तर 6 जवान गंभीर जखमी झाले.

सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरात सुमारे 300 नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या बटालियन 74 वर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या बटालियनमध्ये 90 जवान होते.

जेवण करताना हल्ला 

सुकमातील चिंतागुफामध्ये रस्ते बांधणीचं काम सुरु होतं. तेथील कामगारांना साहित्य पोहोचवण्यासाठी जवान निघाले होते. दुपारी जेवण करत असताना जवानांवर हा हल्ला करण्यात आला. यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांची हत्यारही पळवली आहेत. जवानांवर हल्ला करण्यासाठी नक्षलवादी नेहमीच बॉम्बहल्ला करतात, मात्र आज गोळीबार करत सीआरपीएफ जवानांवर हल्ला करण्यात आला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवानांना श्रद्धांजली

“छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेला हल्ला भ्याड आणि दुर्दैवी आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. प्राणांची पर्वा न करता चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांचा आम्हाला अभिमान आहे. शहिदांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

हल्ल्यामागे कोणाचा हात? 

नक्षलवाद्यांचा गड समजला जाणाऱ्या सुकमात जो हल्ला झाला त्यामागे कुख्यात नक्षली नेता हिडमाचा हात असल्याचं सांगण्यात येतं.  हिडमानेच 300 पेक्षा अधिक नक्षल्यांच्या साथीने हा हल्ला केल्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

छत्तीसगडमध्य़े 300 हून अधिक नक्षलवाद्यांचा हल्ला, CRPF चे 25 जवान शहीद


सुकमा हल्ला : 25 CRPF जवानांच्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड कोण?


5 नक्षल्यांना ठार करणारे जवान शेर मोहम्मद जखमी