मुंबई बुधवारी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे लँडिंग केल्यानंतर विक्रम लँडर (Vikram Lander) आपले काम सुरू केले आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याआधीचे क्षण खास होते. विक्रम लँडर इमेजर कॅमेर्‍याने चंद्रावर उतरण्याआधी व्हिडीओ शूट केला. इस्रोने (ISRO) हा विक्रम लँडरने घेतलेला व्हिडीओ जारी केला आहे. 


इस्रोकडून विक्रम लँडरमधून बाहेर आलेल्या प्रज्ञान रोव्हरच्या हालचालीबाबत माहिती दिली जात आहे. रोव्हर लँडरमधून बाहेर आल्यावर त्याने आपले काम करण्यास सुरुवात केली आहे. इस्रोकडून चांद्रयान-3 मोहिमेची माहिती वेळोवेळी दिली जात आहे. इस्रोने संध्याकाळी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्याआधीचा व्हिडीओ चित्रित केला. त्याची व्हिडीओ क्लिप इस्रोने जारी केली आहे. 







लॅंडर आणि रोव्हरची सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करत असल्याचे इस्रोने सांगितले. विक्रम लँडर मॉड्यूलवरील ILSA, RAMBHA आणि ChaSTE ही उपकरणे आज सुरु करण्यात आल्याची माहिती इस्रोने दिली आहे. ज्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील खनिजं, तेथील वातावरण आणि भूकंपासंदर्भातली माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.  चंद्राच्या भवती प्रदक्षिणा मारणाऱ्या प्रोपल्शनमधील SHAPE उपकरण रविवारी सुरु करण्यात येणार  आहे. विक्रम लँडरने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर काय झालं?


चांद्रयान 3 चे तीन भाग आहेत. त्यामधील एक प्रोप्लशन मॉड्यूल, जो लँडरला चंद्राच्या कक्षापर्यंत घेऊन गेला. त्यामधून विक्रम लँडर वेगळा झाला आणि प्रोप्लशन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत फिरतोय.  त्यामधून दोन भाग वेगळे झाले, त्यामध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचा समावेश आहे. विक्रम लँडरने चंद्रावर लँडिंग केले आहे. या लँडरमधून आता रोव्हर वेगळा झाला आहे. आता प्रज्ञान रोव्हर चंद्रावर फिरणार असून तेथील डेटा इस्रोला पाठवणार आहे. विक्रमच्या यशस्वी लँडिंगनंतर प्रज्ञान रोव्हरने आपले काम सुरू केले आहे. 


प्रज्ञान रोव्हर चंद्रावरील  माती, वातावरणासोबत खनिज याबाबतची माहिती गोळा करुन पाठवेल. दक्षिण ध्रुवावर अशी काही ठिकाणं आहेत, जिथे अब्जावधी वर्षांपासून अंधार आहे, कधीही सूर्यप्रकाश पडलेला नाही. अशा ठिकाणावरुन डेटा गोळा करणे रोव्हरसाठी ऐतिहासिक कामगिरी असणार आहे. 


चंद्राच्या पृष्ठभागावर मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, टायटॅनियम आणि लोह यांसारख्या खनिजांचे घटक आहेत का, याबाबतही संशोधन होणार आहे. 


प्रज्ञान रोव्हर काय करणार? 


प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील माहिती इस्रोला पाठवणार आहे. ही मोहीम 14 दिवसांसाठी चालणार आहे. प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरला जी माहिती पाठवेल ती विक्रम लँडर पृथ्वीवर पाठवणार आहे. 


इतर संबंधित बातमी :