Chandrayaan 3 Launch Date and Time : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने 14 जुलै रोजी या मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेसाठी रॉकेट तयार करण्यात आले आहे. अंतराळयानही पूर्णपणे तयार झाले आहे. याशिवाय वाहनाच्या सर्व आवश्यक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. बुधवारी ही माहिती देताना इस्रोने सांगितले की, प्रक्षेपण होण्यापूर्वी चाचणीची शेवटची फेरी केली जाईल.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने दिलेल्या माहितीनुसार, 3900 किलो वजनाचे हे यान 14 जुलै रोजी सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होणार आहे. ISRO ने संपूर्ण प्रक्षेपण तयारी आणि प्रक्रियेचे अनुकरण करून 24 तासांचे "लाँच रिहर्सल" पूर्ण केल्याची घोषणा केली. संस्थेने लॉन्च पॅडवर स्टॅक केलेले LVM-3 रॉकेट दर्शविणारी नवीन चित्रे देखील दाखवली आहेत.
चांद्रयान-3 अंतराळयान जिओ ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये प्रक्षेपित करण्याच्या उद्देशाने LVM3 चे हे चौथे ऑपरेशनल उड्डाण आहे.
सतीश धवन स्पेस सेंटरमधून होणार प्रक्षेपण
चांद्रयान-3 (Chandrayaan 3) LVM3 रॉकेटमध्ये बसवण्यात आलं आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan 3) प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. इस्रोकडून चांद्रयान 3 लाँच व्हेइकलसोबत म्हणजेच LVM3 रॉकेटसोबत जोडल्यानंतर पुढील चाचणी आणि तपासणी सुरु आहे. चांद्रयान-3 लाँच व्हेईकल मार्क-3 द्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करण्यात येईल. प्रॉपेलंट मॉड्यूल 'लँडर' आणि 'रोव्हर'ला चंद्राभोवती 100 किमीच्या कक्षेत नेईल आणि चांद्रयान 3 अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
14 जुलै रोजी प्रक्षेपण होणार असे गृहीत धरून, चांद्रयान-3 ऑगस्टच्या अखेरीस चंद्रावर पोहोचण्याची अपेक्षा आहे. या प्रवासाला अंदाजे 45-48 दिवस लागतील असा अंदाज आहे, 23 किंवा 24 ऑगस्टच्या आसपास अंतराळयान चंद्रावर पोहोचण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :