आता सर्व जिल्ह्यात पासपोर्ट मिळणार
एबीपी माझा वेब टीम | 13 Jun 2017 06:36 PM (IST)
नवी दिल्ली: केंद्र सरकारने पासपोर्ट सेवेसंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील प्रत्येक जिल्ह्यात पासपोर्ट मिळणार आहे. यासाठी देशभरातील 800 जिल्ह्यातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. व्ही के सिंह म्हणाले, "यंदा 150 पोस्ट ऑफिस कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. पुढील दोन वर्षा सर्व 800 जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात येतील.