मुंबई : 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने टोलमाफीची सूट वाढवली आहे. राष्ट्रीय महामार्गांवर 14 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफीची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली. त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातही टोलमाफीची घोषणा केली.


14 नोव्हेंबरपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील महामार्गावर टोल भरण्याची गरज नाही. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात घोषणा केली. राज्य सरकारनेही यासंदर्भात निर्णय घेऊन लोकांना दिलासा दिला.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर तातडीने राज्यानेही टोलमाफीची घोषणा केली. मुंबईसह राज्यातील सर्व टोलनाक्यांवर 14 नोव्हेंबरपर्यंत टोल वसुली होणार नाही.



सध्या देशभर मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने आज मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी केली होती. पण अजूनही नव्या नोटांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने टोलमाफीची मुदत 14 नोव्हेंबरपर्यंत वाढवली. त्यामुळे आणखी तीन दिवस कुठल्याही टोलनाक्यावर टोल भरण्याची गरज नाही.