नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रायोगिक तत्वावर 10 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटा छापण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

पाच ठिकाणी प्लॅस्टिक नोटांची चाचणी केली जाणार आहे. प्लॅस्टिक नोटा सध्याच्या नोटांच्या तुलनेत चांगल्या असल्याचं अनेकदा समोर आलं आहे, असंही अर्जुन राम मेघवाल म्हणाले.

नोटांचं आयुष्य वाढवण्यासाठी बँकांकडून प्लॅस्टिक नोटा आणण्याची मागणी होती. आरबीआयने तसा प्रस्ताव दिल्यानंतर केंद्राकडून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. सरुवातीच्या काळात फक्त 10 च्या नोटा प्लॅस्टिकच्या असतील, नंतर हा पर्याय अवलंबण्याचा विचार केला जाईल, असं अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं.