तगडी पगारवाढ तरीही अपेक्षाभंग, वेतनवाढीवर सरकारी बाबू नाराज
एबीपी माझा वेब टीम | 29 Jun 2016 12:00 PM (IST)
नवी दिल्लीः भरघोस वेतनवाढीच्या 7 व्या आयोगाला आज मंजूरी मिळाली असली तरी सरकारी बाबू मात्र नाराज आहेत. या शिफारसींमुळ अपेक्षित वेतनवाढ मिळत नसल्यामुळे कर्मचारी संपाची तयारी करत आहेत. केंद्र सरकारने वाढीव भत्ता आणि वेतन आयोगाने केलेल्या शिफारसींनुसार एकूण 23.55 टक्के वेतनवाढ केली आहे. तर मूळ वेतनात 14.27 टक्के वेतनवाढ केली आहे. मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.